नमस्कार शेतकरी बंधूंनो! आज आपण शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. खरीप पिकांसाठी विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची आहे. या बातमीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली आहे. या 370 कोटी 85 लाख रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे. चला तर मग, या सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये जाणून घेऊयात
2023 मधील खरीप हंगामातील विमा आणि नुकसान भरपाई
2023 मधील खरीप हंगामात, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसाठी विमा उतरवला होता. त्या जिल्ह्यातील 4,833 शेतकऱ्यांपैकी, नुकसान झालेल्या 3 लाख 64 हजार 799 शेतकऱ्यांना बँक खात्यात एकूण 370 कोटी 85 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. हे अनुदान नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळाले आहे. गतवर्षी, खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
पिक विमा कंपन्यांकडून मिळालेली अग्रीम रक्कम
गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या 324 शेतकऱ्यांना, पीक विमा कंपन्यांकडून 25% अग्रीम रक्कम म्हणून 330 कोटी रुपये दिले गेले होते. परंतु, काही शेतकऱ्यांची पीक पडताळणी पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यामुळे, स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून, वैयक्तिक तक्रारदारांना मे आणि जून महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात हे अनुदान वितरित करण्यात आले. आता, शेवटच्या आणि अंतिम टप्प्यात, 364 शेतकऱ्यांना 40 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विमा वाटप
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, गतवर्षीच्या हंगामात, एकूण 4 लाख 38 हजार 203 शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसाठी विमा उतरवला होता.
- त्यापैकी 83% म्हणजेच 3 लाख 64 हजार 799 शेतकऱ्यांना, पीक विम्याची 370 कोटी 85 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.
- परंतु, 73,400 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. ही रक्कम वैजापूर तालुक्यातील 8215 शेतकऱ्यांनी उतरवलेल्या पिक विम्याच्या आधारावर देण्यात आली आहे.
- या शेतकऱ्यांना 98.8% म्हणजे 81,164 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा पोटी 105 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
तालुक्यांनुसार वितरण
विम्याची रक्कम जिल्ह्याच्या आणि तालुक्यांच्या आधारे वितरित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना 24.5 कोटी रुपये मिळाले आहेत. गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 57.5 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. कन्नड तालुक्यात 51 कोटी रुपये, खुलताबादमध्ये 10 कोटी रुपये, पैठणमध्ये 26.4 कोटी रुपये, फुलंब्री तालुक्यात 14.8 कोटी रुपये, सिल्लोड तालुक्यात 48.5 कोटी रुपये, सोयगाव तालुक्यात 31.4 कोटी रुपये आणि वैजापूर मधील शेतकऱ्यांना 105 कोटी रुपये पीक विमा रक्कम म्हणून वितरित करण्यात आलेली आहे.